औरंगाबाद: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 128 वी जयंती आज मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मध्यरात्री बारा वाजता फटाक्यांची आतषबाजी, डीजेचा दणदणाट व जयजयकाराच्या घोषणांनी सारा आसमंत दणाणून गेला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मध्यरात्री हजारो भीमसैनिकांनी भडकल गेट येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तसेच सकाळपासून विविध पक्ष, संघटनांच्या वतीने अभिवादन करण्यात येत आहे.
लोकसभेची निवडणूक या महिन्यात होणार आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप, रिपाइंचे सर्व गट, पँथर्स रिपब्लिकन पार्टी, बहुजन समाज पार्टी, बहुजन रिपब्लिकन समाज पार्टी, स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी, भारतीय दलित पँथर, एम.आय.एम., भारिप बहुजन महसंघ, रिपब्लिकन सेना आदी पक्षाच्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची मोठी गर्दी दिसून आली. बाबासाहेबांना अभिवादन करणार्यांमध्ये प्रामुख्याने आ. अतुल सावे, आ. हर्षवर्धन जाधव, आ. सुभाष झांबड, जि.प. अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर, महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर विजय औताडे, मनपा आयुक्त डॉ.निपुण विनायक, डॉ. अरविंद गायकवाड, नगरसेवक रुपचंद वाघमारे, कैलास गायकवाड, जि.प. सदस्य रमेश गायकवाड, नगरसेवक राहुल सोनवणे, अरुण बोर्डे, जालिंदर शेंडगे, उत्तम अंभोरे, उत्तम कांबळे, योगेश दणके, शुभम सुरे, नामदेव पवार, नवीनसिंग ओबेरॉय, अनिल मालोदे, प्रशांत शेगावकर, सचिन शिरसाट, डॉ. जितेेंद्र देहाडे, राहुल सावंत, संतोष भिंगारे, बाबुराव कदम, काशीनाथ कोकाटे, मिलिंद शेळके, बाळकृष्ण इंगळे, नागराज गायकवाड, अप्पाराव इंगळे, गजानन निकाळजे, एकबालसिंग ओबेरॉय, किशोर थोरात, संजय ठोकळे, श्रावण गायकवाड, मधुकर चव्हाण, प्रकाश गायकवाड, लक्ष्मण हिवराळे, मिलिंद दाभाडे, नगरसेवक कृष्णा बनकर, गजानन बारवाल, भारिप बहुजन महासंघाचे तातेराव काळे, शिवसेना शहर उपप्रमुख बाबासाहेब डांगे, लक्ष्मीकांत पिंपळे, रवी चांदणे, कमलेश चांदणे, प्रशांत मगरे, धम्मदीप वाघ, निलेश घोगंडे, आकाश वाहुळ, बबलू प्रधान, स्वप्नील डोंगरे, विशाल साळवे, अविनाश बोर्डे आदींची उपस्थिती होती. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा उत्साह चांगलाच वाढलेला दिसतो. सायंकाळी निघणार्या मिरवणुकांमध्ये पुणे, नाशिक, मुंबई येथून डीजे, झांज पथक व ढोलताशे मागविण्यात आले आहेत.
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त संविधान वाचन
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त छत्रपती शिवचरित्र पारायण सप्ताह सोहळा समितीच्या वतीने क्रांतीचौक येथे संविधान वाचन करण्यात आले. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. चंद्रकांत भराट, प्रा. मिर्झा सलीम बेग, प्रा. एस. पी. जवळकर, किरण पाटील, प्रल्हाद शिंदे, डॉ. मच्छिंद्र बोर्डे, प्रा. आयुब पठाण, प्रा. संजय रणदिवे आदींसह विद्यार्थी, नागरिकांनी सहभाग नोंदवून संविधानाचे जाहीर वाचन केले. शहरातील उस्मानपुरा विभागातील कबीरनगर, मिलिंदनगर, मुरलीधरनगर, नागसेननगर, महात्मा फुलेनगर, एकनाथनगर, भीमपुरा, रमानगर, जवाहर कॉलनी, बौद्धनगर, पंचशीलनगर, अशोकनगर, शहाबाजार, सिद्धार्थनगर, आंबेडकरनगर, मिसारवाडी, भावसिंगपुरा, पद्मपुरा, भीमनगर, हर्षनगर, हर्सूल, नारेगाव, मिलकॉर्नर, भोईवाडा, शाक्यनगर, महूनगर, हमालवाडा, राहुलनगर येथे सकाळपासून भीमसैनिक व महिला मंडळाच्या वतीने बौद्धविहार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर बौद्धवंदना घेऊन कार्यक्रम घेण्यात आला.